निरंजना न्युज नेटवर्क- निलेश बाबर
‘ मकरंद आबांच्या शिलेदारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद’
पाचवड ता. वाई पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर पाचवड पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण कमलीचे तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. राणी कांतीलाल पवार यांनी गेल्या आठ दिवसांपासून पाचवड गणातील असणाऱ्या वाडी वस्त्यावरील गावात ‘होम टू होम’ प्रचार करून प्रचाराचा धडाका उडवून दिला आहे. यावेळी जनतेने दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता पाचवड पंचायत समिती गणात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. वाई विधानसभा मतदारसंघाचे नामदार मकरंद आबा पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली सौ. राणी कांतीलाल पवार या पंचायत समिती गणात उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. पाचवड पंचायत समिती गणातील प्रत्येक गावातील गल्लीत आणि घराघरात जाऊन सौ. राणी पवार या मतदारांशी थेट संवाद साधताना दिसून येत आहेत. नागरिक स्वतःहून बाहेर पडून या उमेदवारांचे जंगी स्वागत करताना दिसत आहेत. प्रचारा दरम्यान बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, नामदार मकरंद पाटलांचे कार्य व त्यांचे असणारे खंदे समर्थक कांतीलाल पवार यांचे पाचवड गणात गावा गावांमध्ये असणारे लोकांशी नाते व लोकांची केलेली कामे तळागाळातील जनतेला माहिती असून सुज्ञ मतदारांचा कौल सौ. राणी पवार यांच्या बाजूने आम्ही देणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट सांगितले. कांतीलाल पवार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भांडून जनतेची कामे करून घेणारे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती सौ. राणी पवार यांना पाचवड गणातील मिळालेली उमेदवारी ही राष्ट्रवादीसाठी भक्कम बाजू आहे. त्यामुळे सौ.राणी पवार यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहू असा विश्वास यावेळी गावा गावातील ग्रामस्थांनी व्यक्त करत सौ. राणी कांतीलाल पवार यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला.











