*भुईंज येथील सीसीटीव्ही कॅमेरे भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी ग्रामपंचायती मध्ये ठराव मंजूर* *दोषीवर कारवाई करण्याची ग्रामस्थांमधून मागणी*


*भुईंज करांना न्याय दिल्या शिवाय गप्प बसणार नाही चंद्रकांत जाधवराव*

भुईंज प्रतिनिधी–सचिन इथापे 

– भुईंज सीसीटीव्ही खरेदीसह ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विविध गैरप्रकारांची चौकशी करून, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये केल्यावर हा ठराव मान्य करण्यात आला.

या ठरावासाठी अमित सूर्यवंशी हे सूचक, तर चंद्रकांत जाधवराव अनुमोदक होते. याबाबत माहिती अशी की, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी गावात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली होती. त्याबाबत तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीस अनुसरून या प्रकरणाची शासकीय चौकशी झाली. या चौकशीत अनेक त्रुटी स्पष्ट झाल्या. त्या अहवालातील वस्तुस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पाठपुरावा करून आणि आंदोलनाचा इशारा देऊनही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकरणाच्या चौकशीस प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. एवढे पैसे खर्च करूनही सीसीटीव्ही कॅमेरे कुठे गेले, असा सवला उपस्थित होत आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधवराव व अमित सूर्यवंशी यांनी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

गेली तीन वर्षे मी व माझे सहकारी अमित सूर्यवंशी भुईंज ग्रामपंचायती मध्ये झालेल्या गैर व्यवहारासंबधी पाठपुरावा करत आहोत मात्र, सक्षम अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत. काहीही झाले तरी आम्ही भुईंज च्या जनतेसमोर हा सीसीटीव्ही भष्टाचार उघड केल्याशिवाय गप्प बसणार नाही. चंद्रकांत जाधवराव सामाजिक कार्यकर्ते. भुईंज . …..


86
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!