* शेती मशागतीचे दर वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस; इंधन दरवाढ ठरतेय शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी; जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या तयारीत व्यस्त*


निरंजना न्यूज नेटवर्क-निलेश बाबर 

खरीप हंगाम तोंडावर आल्याने जिल्ह्यातील शेतकरी सध्या शेती पूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असून शेतकरी वर्ग खरीपाच्या तयारीसाठी पहाटेपासून आपल्या कुटुंबां समवेत शेतात राबताना दिसत आहेत. मात्र, सध्या डिझेल पेट्रोलचे दर वाढल्याने व पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने मशागतीचे दर वाढले आहेत. दरम्यान, इंधनाचे वाढलेले दर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंधनाची तीव्र कमतरता भासत असल्यामुळे शेती मशागतीच्या खर्चात मोठी वाढ झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी खरीप पेरणीसाठी दिवसरात्र शेतात रात्र दिवस राबत आहेत. मशागतीची प्राथमिक कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या धावपळ सुरू आहे. मात्र, इंधनाची झालेली दरवाढ व वेळेत इंधन उपलब्ध न झाल्याने ट्रॅक्टर व कृषी यंत्रांच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मशागतीचे दर ३०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. सध्याच्या काळात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला असल्याने बैलजोडी सांभाळताना कोणी दिसत नाही. त्यामुळे शेतकरी कमी वेळेत यंत्राद्वारे काम करताना दिसत आहेत. ट्रॅक्टरने रोटावेटर करणे, नांगरणे, फणणे, पेरणी करणे, आदी सर्व कृषी कामांचे भाडे वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच इंधन टंचाई बरोबरच मजूर टंचाई सुद्धा अधिक तीव्र झाल्याने उपलब्ध मंजुरा कडून वाढीव मजुरीची मागणी केली जात आहे. अगोदरच रासायनिक खतांच्या वाढत्या महागाईने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच इंधन दरवाढीचा परिणाम केवळ शेती पुरता मर्यादित नसून माल वाहतूक व्यवसाया वरही झाला आहे. ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्याने शेतीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांच्या बाजारभावात वाढ करण्यात आली आहे. (चौकट)- *रासायनिक खते व इंधन टंचाईने शेतकरी त्रस्त*- शेतातील काम करत असताना ते वेळेत होण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करतात. मात्र, सध्या रासायनिक खतांचे व इंधनाच्या वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड बनले आहे. त्यामुळे शेती करावी की सोडावी या दुहेरी समस्येने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

*मशागतीच्या दर वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस*– मागील वर्षी शेती मशागतीची नांगरट करण्यासाठी ३८०० ते ४००० प्रति एकर रुपये मोजावे लागत होते. यावर्षी मात्र त्याच कामासाठी ४३०० ते ४५०० पर्यंत भाववाढ झाली आहे. सध्या इंधनाचे वाढलेले दर व तुटवड्यामुळे शेती मशागतीचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतीचे कामे करताना दर वाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.


86
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!