निरंजना न्युज नेटवर्क – निलेश बाबर
भुईंज जिल्हा परिषद गटातील रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला सक्षमीकरण करण्या बरोबरच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्राधान्य राहील अशी ग्वाही भुईंज जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार श्री. दिलीप बाबर यांनी दिली. भुईंज जिल्हा परिषद गटाच्या अस्तित्वासाठी व सर्वांगीण विकासाचा ठोस भुमिके सह उमेदवारी अर्ज दाखल केलेले श्री. दिलीप बाबर प्रचार दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी भुईंज जिल्हा परिषद गटातील आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रस्ते तसेच तरुणांच्या रोजगार संधी यावर विशेष भर दिला आहे. या अगोदर भुईंज जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केल्यामुळे गटातील गावोगावी असणाऱ्या समस्यांचा मला अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर त्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करत असल्याने मतदारांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हेच माझे ध्येय आहे. अशी भूमिका श्री. दिलीप बाबर यांनी प्रचार दरम्यान व्यक्त केली. त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे आणि अभ्यासू नेतृत्वामुळे भुईंज गट पुन्हा एकदा गुलाला साठी सज्ज झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. भुईंज जिल्हा परिषद गटांमध्ये गाव भेटी, बैठका, पदयात्रा तसेच घरा घरातून सुरू असलेल्या प्रचारामुळे भुईंज गटातील निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे. भुईंज जिल्हा परिषद गटामध्ये दिलीप बाबर यांना वाढता प्रतिसाद मिळत असून गावोगावी प्रचार, थेट भेटी गाठींना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती दिलीप बाबर यांच्या कार्यकर्त्यांनी दिली. त्यांना गावोगावी वाढता पाठिंबा मिळत आहे. महिला, युवक, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारी विषयी सकारात्मक चर्चा सुरू असून नवी पिढी, नवा दृष्टिकोन अशी भावना मतदारांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत दिलीप बाबर यांच्या मुळे विजयाची नांदी होणार असल्याचा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.











