भुईंज/प्रतिनिधी– सचिन इथापे.
वाई पश्चिम भागातील जिल्हा परिषद यशवंतनगर गट निवडणुकीमध्ये प्रथमच पश्चिम भागातील स्थानिक युवा भूमि पुत्राला उमेदवारी मिळाल्याने येथील जनतेच्या मनात आनंदाचे व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी नव्हे तें पश्चिम भागातील चिखली यां गावातील रोहित वाडकर यां तरुण उद्योजकाला पश्चिम भागाचे नेतृत्व करायला भारतीय जनता पार्टीने संधी दिली आहे. त्या संधीचे सोने करण्याचा विडा पश्चिम भागाने उचलला असून
यशवंतनगर जिल्हा परिषद गटामधून पश्चिम भागातील जनतेच्या हिता”साठी रोहित वाडकर हा युवा चेहरा जनतेच्या पसंतीला उतरला आहे. आजवर फक्त प्रस्थापित नेत्यांनीच पश्चिम भागात गटातटाचे राजकारण केल्याने स्थानिक भूमि पुत्रांना डावलण्यात आले. पेशाने इंजिनियर असलेल्या रोहित वाडकर सुशिक्षित व अभ्यासू युवकाच्या रूपाने प्रस्थापित नेत्यांच्या कुटील राजकारणाला छेद दिला आहे. पिढ्यानं पिढ्या अनेक समस्या व अडचणींनी ग्रासलेल्या व त्रासलेल्या पश्चिम भागाला सर्वांगाणी विकसित करण्यासाठी रोहित वाडकरां च्या माध्यमातून उदयास आलेले सक्षम व अभ्यासू नेतृत्व जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी पश्चिम भागातील सर्व सामान्य जनता एकसंघ होवून सज्ज झाली आहे. रोहित वाडकर या नावातच पश्चिम भागाचे नाव रोशन करण्याचे हित असल्यामुळे भविष्यात पश्चिम भाग प्रकाशमान होण्यासाठी चालना मिळणार आहे. पश्चिम भागातील शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय असो की आरोग्याचे व शेतीचे प्रश्न असो सत्ता नसताना कुठलेही लाभार्थी पद नसताना त्या त्या वेळी झोपलेल्या प्रशासना ला जाग करण्याचे काम निस्वार्थीपणे रोहित वाडकर करत आलेले आहेत. पश्चिमभागातील भोळ्या भाबड्या जनतेच्या मतांवर आजपर्यंत सत्ता भोगलेल्या राजकीय नेत्यांना धोम धरण होऊन पन्नास वर्ष उलटली तरी धरण ग्रस्थांचे पुनर्वसन करता आलेले नाही. धोम जलाशयाचा विस्तीर्ण साठा असताना पर्यटन व रोजगार निर्मिती करता आलले नाही नेत्यांच्या पाठिंब्या वर बाहेरील माणसे बोटिंग व्यवसाय करून पश्चिम भागातील जनतेला एकप्रकारे वाकुल्या दाखवत आहेत. हे सगळं बंद करायचं असेल तर रोहित वाडकर यां उमदया तरुणांसाठी यावेळी पश्चिम भागात कमळ फुलवण्यासाठी येथील हुकूमशाही व दडपशाही मोडून काढण्यासाठी येथील जनतेने पावले उचलली आहेत.
पश्चिम भागातील मोजक्याच कार्यकर्त्यांना हाताशी येथील जनतेला फसवण्याचा गोरख धंदा राजकीय नेत्यांनी केला आहे. आजपर्यंत पश्चिम भागातून भरघोस मतदान घेऊनहीसर्वच नेत्यांना भागाचा विकास साधता आला नाही लग्न बारसी सत्यनारायण पूजेला हजेरी लावून येथील जनतेची भावनिक फसवणूक करणाऱ्या नेत्यांना पश्चिम भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती करता भूमी पुत्राला उमेदवारी देता येत नाही यासारखं भागाच दुसरं दुर्दैव नाही. गेली पन्नास वर्ष रखडलेल पुनर्वसन करायच सोडून प्रशासनाची भीती दाखवून उरलीसुरली गाळपेर जमीनही भूमि पुत्राच्या ताब्यातुन काढून घेण्याची तयारी नेत्यांनी केली आहे. पुतना मावशीचं हे प्रेम पश्चिम भागातील जनतेच्या आता लक्षात आले आहे. गोड बोलून भागातील जनेतेवर आजपर्यंत केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्या बरोबरच भागाचा शाश्वत खरा विकास साधण्यासाठी पश्चिम भागाचा भूमिपुत्र रोहित वाडकरचं पाहिजे असा ठाम निश्चय करून धोम जलाशयात यावेळी फक्त आणि फक्त कमळ’च फुलवण्याची जोरदार तयारी पश्चिम भागातील मतदारांनी केली आहे एवढं निश्चित…











