*ॲड. शितल वारागडे यांचा थेट मतदारांची संवाद* *भुईंज गणात गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद*


निरंजना न्यूज – निलेश बाबर

भुईंज पंचायत समिती गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. शितल प्रमोद वारागडे यांचा प्रचार झंझावाती स्वरूपाचा ठरत असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भुईंज गणातील गावोगावी, वाडी वस्तीवर त्या थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. भुईंज गणातील असे एकही गाव, वाडी अथवा वस्ती उरलेली नाही. जिथे सौ. शितल वारागडे पोहोचलेल्या नाहीत. प्रचारा दरम्यान त्या स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या अडी अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेत आहेत. भुईज गणातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी समाज कारणाला राजकारणाची जोड मिळावी यासाठी मी ही उमेदवारी स्विकारली आहे. त्यामुळे या गणाच्या विकास कामांसाठी ना. मकरंद (आबा) पाटील यांच्या माध्यमातून निधी कमी पडून देणार नाही. याची मी ग्वाही देते असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ थोडा आहे. आपल्या प्रचाराची खरी जबाबदारी तुम्हा कार्यकर्त्यांवर आहे. माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे तरुण, तडफदार, धडाडीचे उमेदवार प्रमोद (दादा) शिंदे यांनाही समाजसेवेचा वारसा आहे. तो आम्ही असाच पुढे चालू ठेवू. असे प्रतिपादन ॲड सौ. शितल वारागडे यांनी केले.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!