निरंजना न्यूज नेटवर्क
भुईंज जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी जिल्हा परिषद गटातून उभा असून भुईंज गणातून ॲड शितल वारागडे या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. त्यामुळे गटाचा व गणाचा विकास करण्यासाठी आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन भुईज जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रमोद (दादा) शिंदे यांनी प्रचार दौऱ्या दरम्यान केले. भुईंज जिल्हा परिषद गटातील गाव भेटी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना भुईंज पंचायत समिती गणाच्या उमेदवार ॲड. शितल वारागडे म्हणाल्या की, मी या गावची सून आहे तशी लेक सुद्धा आहे. आमच्या कुटुंबाला समाजसेवेच्या परंपरेचा वारसा आहे. तीच परंपरा मी पुढे सुरू ठेवत आहे. समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी समाजकारणाला राजकारणाची जोड मिळावी यासाठी मी ही उमेदवारी स्वीकारली आहे. आज गावापासून ते शहरापर्यंत नामदार मकरंद आबांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकास कामाचा निधी मिळत आहे. यापुढे ही मिळणार आहे. आपल्या प्रचाराची खरी जबाबदारी तुमच्यावर आहे. प्रचारासाठी वेळ कमी आहे. माझ्यासोबत भुईंज जिल्हा परिषद गटाचे तरुण, तडफदार, धडाडीचे उमेदवार श्री प्रमोद (दादा) शिंदे यांनाही समाजसेवेचा वारसा आहे. तो वारसा आम्ही दोघे मिळून असाच पुढे चालू ठेवू असे प्रतिपादन शितल वारागडे यांनी केले. यावेळी बोलताना भुईंज जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रमोद (दादा) शिंदे म्हणाले की, गत पंचवीस वर्षापासून भुईंज विभागात प्रत्येक गावामध्ये रस्ते, पाणी, विजेची सोय असो समाज मंदिर, शाळा असो नामदार मकरंद आबांच्या माध्यमातून गावागावात घराघरात विकासाचे जाळे निर्माण झाले आहे. नामदार मकरंद आबांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे या भुईंज गटात केली आहेत. त्यामुळे आबांच्या बरोबर आमच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी भुईंज गटाचा विकास साधण्यासाठी आम्हा उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन यावेळी प्रमोद (दादा) शिंदे यांनी मतदारांना केले.











