निरंजना न्युज नेटवर्क – निलेश बाबर
भिलार :-
गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे या परिसरात बिबट्याचा वावर लक्षणीयरीत्या वाढला होता. बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या होत्या.
वनविभागाने बिबट्याच्या संभाव्य धोक्याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये वारंवार जनजागृती केली, तसेच रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रात्रगस्त देखील सुरू केली होती.वनविभागाच्या प्रयत्नांना मोठे यशया प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले आहे! वनविभागाने भोसे परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात काल रात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात यश आल्याने परिसरातील नागरिकांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला आहे.सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ही मोहीम श्री. अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, सातारा आणि श्री. प्रदीप रौंदळ, साहाय्यक वनसंरक्षक, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच श्री. म. ह. मोहिते, वनक्षेत्रपाल, महाबळेश्वर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.अधिकारी आणि ग्रामस्थांचा सहभाग बिबट्याला पिंजराबंद करण्याच्या कामात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग घेतला.
मोहिमेत सहभागी झालेले कर्मचारी:
आर. व्ही. काकडे (वन परिमंडळ अधिकारी, गुरेघर)तानाजी केलगणे (वनरक्षक, मेटगुताड)
बी. सी. जावीर (वनरक्षक, गुरेघर)
संजय श्रीपती भिलारे (कायवन मजूर, गुरेघर)
यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने हा बिबट्या पकडण्यात आला. यावेळी राम गोळे, राहुल गोळे, तुषार गोळे, विजय गोळे, आदित्य गोळे, लखन गोळे, सौरव गोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला सुरक्षित स्थळी हलवण्याची पुढील कार्यवाही वनविभागाकडून सुरू आहे. वनविभागाच्या या तत्परतेमुळे परिसरातील मोठी चिंता दूर झाली असून, ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानले आहेत.











