उडतरे – ग्रामपंचायतीतर्फे गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गावाच्या सुरक्षा व्यवस्थेत भर


निरंजना न्यूज नेटवर्क- निलेश बाबर

उडतरे गावातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उडतरे ग्रामपंचायतीतर्फे विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. गावाच्या मुख्य रस्त्यांसह चौक, सार्वजनिक ठिकाणे, शाळेजवळील परिसर ,मंदिरे या महत्त्वाच्या भागांमध्ये १२ वित्त आयोगातून एकूण १३ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.मागील काही दिवसांत भर दिवसा चोरीच्या घटना घडत होत्या त्या व्यतिरिक्त अन्य घटनांना आळा बसवण्याच्या अनुषंगाने cctv बसवण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीच्या उपक्रमामुळे गावात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत वेगाने कारवाई करणे शक्य होणार आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेस सुरक्षा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

ग्रामस्थांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. पुढील काळात आणखी काही ठिकाणी कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली.

गावाच्या सुरक्षिततेसाठी केलेला हा उपक्रम गावाच्या सुरक्षेसाठी प्रशंसनीय ठरत आहे.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!