पुणे–बेंगलोर महामार्गावरील उडतरे गावाजवळ सेवा रस्ता खचल्याने अपघातांची शक्यता


निरंजना न्युज नेटवर्क-निलेशबाबर

उडतरे : पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उडतरे गावाच्या हद्दीत असलेला सेवा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला असून या ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे.हा खड्डा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ,ट्रक अशा ,कार अशा वाहनांना मोठा धोका वाढला असून
मोठा अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या या सेवारस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

संबंधित विभागाने तत्काळ पाहणी करून रस्ता दुरुस्त केल्यास संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


117
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!