https://niranjananewsnetwork.co.in/wp-content/uploads/2025/11/1763741820972962.mov
व्हिडीओ पाहण्यासाठी वरील ☝️लिंक वर क्लिक करा
उडतरे -पाचगणी मार्गे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर रोजच ही वर्दळ पाहायला मिळते.वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे काणाडोळा करताना पाहायला मिळत आहे.शाळा सुटण्याच्या वेळात आज शुक्रवारी अशी कोंडी झाली होती.
गावातील काही गटारांवरील फुटलेले चेंबर्स,आणि गटारांची अव्यवस्थित उपाययोजना,तसेच काही अतिक्रमणे यामुळे गावातील ग्रामस्थांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.काही कारखाने याच भागात असून ऊसवाहतूक करणारी वाहने पण या रस्त्याने ये जा करत असतात त्यामुळे.सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी प्रत्यक्ष पाहणी करून यावर उपाययोजना करावी असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.अन्यथा कोणती दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार हा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित होताना दिसत आहे.











