निरंजना न्यूज- निलेश बाबर
भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना लि., भुईंज यांनी गळित हंगाम 2025-26 मध्ये अवघ्या 22 दिवसांत 1 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण केल्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांच्या विश्वास आणि सहकार्यातून हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात कारखान्याला यश आले आहे.
कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले की, येणाऱ्या काळातही ऊस उत्पादकांनी अशीच साथ देत गाळपाचे ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या कामगिरीमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वाहतूक कंत्राटदार यांचे योगदान मोलाचे ठरले असून त्यांचे चेअरमन- ना. मकरंद पाटील ,व्हाईस चेअरमन-प्रमोद शिंदे,कार्यकारी संचालक-जितेंद्र रणवरे ,आणि सर्व संचालक मंडळ यांच्यातर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
Views: 375











