निरंजना न्यूज नेटवर्क-निलेश बाबर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान* अंतर्गत कळंभे ता.वाई येथे पशुवैद्यकीय दवाखाना उडतरे, जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती वाई व ग्रामपंचायत कळंभे यांचे वतीने नवीन गावठाण कळंभे येथे गावातील देशी गोवंशाचे पूजन करून पशुवैद्यकीय तपासणी व लसीकरण शिबिरास प्रारंभ करण्यात आला .त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री जयसिंग सिसोदिया, साहेब,यांनी दुधाळ जनावरांचे असणारे साथीचे आजार यापासून बचाव करणे ,वेळेवर लाळ खुराकीचे लसीकरण करणे व दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्नता प्राप्त करणे याविषयी मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशणी नागराजन व वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री विजयकुमार परीट साहेब ,विस्तार अधिकारी श्री. रुपेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री जयसिंग सिसोदिया, साहेब,पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर भोकरे साहेब , पशुधन पर्यवेक्षक डॉ. शिल्पा बनकर, डॉ.श्री शेख साहेब , कळंभे गावच्या प्रथम नागरिक सौ. निलम शिवथरे ,उपसरपंच सौ.शकुंतला चव्हाण, ग्रामविकास अधिकारी श्री.रघुनाथ भोईर,आदर्श सरपंच ज्योती गायकवाड, माजी सरपंच सौ.सारिका गायकवाड ,माजी उपसरपंच श्री.आबाजी सुतार, राष्ट्रीय उत्कृष्ट उपसरपंच श्री. प्रकाश बाबर , सीआरपी सौ.नुतन बाबर, कृषीसखी सौ. उल्का शिवथरे , सौ.अश्विनी शिंगटे,सौ. अश्विनी बाबर,विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री.यशवंत आबा शिवथरे ,माजी चेअरमन श्री.तानाजी शिवथरे ,प्रगतशील शेतकरी श्री. गजाननभाऊ गायकवाड, श्री.नितीन शिवाजी गायकवाड, श्री राजेंद्र संपत शिवथरे ,श्री शंकर विठ्ठल गायकवाड, श्री.रणजीत रामचंद्र गायकवाड ,श्री .शंकर पनवेलकर,श्री.शरद पनवेलकर,श्री मनोरंजन गायकवाड, श्री भोजराज वाघ, श्री संग्राम शिंगटे,श्री विशाल गायकवाड,ग्रा.प.कर्मचारी श्री.दिलीप बापू वाघ ,सौ.माधुरी वाघ व ग्रामस्थ उपस्थित होते. सहकार्याबद्दल सर्व अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ यांचे आभार मानण्यात आले.











