निरंजना न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी : सचिन इथापे
वाई तालुक्यातील नामदार मकरंद (आबा) पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओझर्डे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विकासाभिमुख, लोकविश्वासाचे अभ्यासू नेतृत्व असलेल्या वृषालीताई चव्हाण यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून पुढे आले असून, त्यांच्या उमेदवारीची संपूर्ण गटात जोरदार चर्चा सुरू आहे.
उच्चशिक्षित, स्वच्छ चारित्र्य, ठाम भूमिका आणि थेट जनसंपर्क ही वृषालीताई चव्हाण यांची प्रमुख ओळख आहे. शेतकरी, महिला, युवक, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्या नेहमीच अग्रभागी राहिल्या असून, त्या केवळ नेत्या नसून जनतेच्या विश्वासाचा आश्वासक चेहरा म्हणून ओळखल्या जात आहेत.
सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून वृषालीताई चव्हाण यांनी ओझर्डे जिल्हा परिषद गटात घरोघरी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्यपद्धती, पारदर्शक नेतृत्व आणि भविष्यासाठी स्पष्ट विकासदृष्टीमुळे मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ओझर्डे जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत वृषालीताई चव्हाण यांनी देगाव येथील प्रचार दौऱ्यावेळी व्यक्त केले.











