निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
उडतरे दि. २५
भारतीय जनता पार्टीच्या गटातील प्रचाराची झंजावती सुरुवात झालेली असून भुईंज मधील प्रत्येक घराघरात भुईंज गटातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी भेट देऊन आपली भूमिका स्पष्ट करून आपल्याला बहुमताने निवडून देण्याची भूमिका स्पष्ट केली.
भारतीय जनता पार्टीच्या भुईंज विभागातील भुईंज गटाचे उमेदवार दिलीप बाबर आणि माजी आमदार मदन दादा भोसले यांच्या कन्या सुरभी मदन भोसले यांनी भुईंज गटामध्ये प्रचाराची झंजावती सुरुवात केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या भुईंज गटातील सर्वच उमेदवारांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतलेली असून वाई तालुक्याचे आमदार ,नामदार मकरंद पाटील यांचे समोर प्रचंड मोठे आव्हान निर्माण केलेले आहे. भुईंज गटामध्ये मकरंद पाटील यांच्या कट्टर विरोधक मदनदादा भोसले यांच्या कन्या यांना भुईंज गणातील उमेदवारी मिळाल्यामुळे भुईंजगणामध्ये आणि भुईंज गटांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झालेली दिसून आहे. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पंचायत समितीमध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी माजी आमदार मदन दादा भोसले यांना चितपट करून भुईंज गटातील तीनही जागा जिंकलेल्या होत्या. परंतु यावेळी ची निवडणूक अतिशय वेगळ्या पद्धतीने लढवली जाणार असून भारतीय जनता पार्टीची ताकद वाई तालुक्यात प्रचंड वाढलेली असून महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वाई तालुक्यांमध्ये लक्ष घातलेले आहे.
वाई नगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे आणि वाई तालुक्याचे माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते मदनदा भोसले यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे.
वाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून मदन दादा भोसले आणि नामदार जयकुमार गोरे यांनी नामदार मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना चितपट केले असल्याने ह्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सध्या तरी भारतीय जनता पार्टीने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असून भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार घरोघरी जाऊन आपली भूमिका पटवून देण्यात यशस्वी ठरत आहेत.
वाई तालुक्याचे आमदार मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सुद्धा ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतलेली असून या निवडणुकीमध्ये मकरंद पाटील यांनी सर्वात ताकतीनिशी आपले उमेदवार उभे केलेले आहेत.
यामुळेच या वेळची पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची होणार या तिळमात्र शंका नाही.











