वरखडवाडी स्मशानभूमी येथून महावितरणच्या तांब्याच्या तारा चोरी वाई तालुक्यात अज्ञात चोरट्यांचा धाडसी प्रकार, 1.20 लाखांचे नुकसान


  • निरंजना न्यूज नेटवर्क -प्रतिनिधी संजय भाडळकर

वाई तालुक्यातील मौजे वरखडवाडी स्मशानभूमी परिसरात महावितरण (MSEDCL) कंपनीच्या मालकीच्या वीज वितरण यंत्रणेमधील तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी दि. 21 जानेवारी 2026 रोजी सायं. 6.00 वा. ते दि. 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वा. दरम्यान घडली असून, याप्रकरणी दि. 23 जानेवारी 2026 रोजी सायं. 5.24 वा. वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत डि.पी. क्र. 1211095/100 KVA AG व डि.पी. क्र. 1211090/100 KVA AG येथील प्रत्येकी सुमारे 180 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा तोडून खाली उतरवून चोरून नेण्यात आल्या. एकूण अंदाजे 360 किलो तांब्याच्या तारा चोरीस गेल्या असून, त्याची अंदाजे किंमत रु. 1,20,000/- इतकी आहे. याशिवाय ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल खाली सांडल्याने अतिरिक्त नुकसान झाले आहे.
ही वीज यंत्रणा परिसरातील शेती पंपांसाठी बसवलेली होती. घटनेमुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 324(4) तसेच महाराष्ट्र विद्युत कायदा कलम 136 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वाई पोलीस करीत आहेत.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!