*पाचवड पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. राणी कांतीलाल पवार यांना जनतेचा वाढता पाठिंबा*


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

गावोगावी संपर्क दौऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचवड पंचायत समिती गणात नामदार मकरंद पाटील यांचे खंदे समर्थक गत चाळीस वर्षापासून पाटील कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले कांतीलाल (तात्या) पवार यांच्या पत्नी सौ. राणी कांतीलाल पवार यांना पाचवड गणातून उमेदवारी दिली आहे. दरम्यान सौ.राणी पवार यांना पाचवड गणातील गावांमधून मोठ्या प्रमाणात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कांतीलाल पवार हे ४० वर्षापासून सामाजिक, राजकीय कार्यात सक्रिय असून शेतकरी, महिला, कष्टकरी, कामगार, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सद्यस्थितीत त्यांच्या पत्नी सौ. राणी कांतीलाल पवार ह्या पाचवड गणातून पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून उभ्या असल्याने पाचवड गणातील गावोगावी संपर्क दौऱ्यात त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून घरा घरातून पाठिंब्याचा सुर उमटत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पाचवड पंचायत समिती गणात सौ. राणी कांतीलाल पवार यांच्या
गळ्यात विजयाची माळ पडणार हे नक्की आहे.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!