निरंजना न्यूज नेटवर्क – प्रतिनिधी सचिन इथापे
गत वीस वर्षापासून जननायक नामदार मकरंद (आबा) पाटील यांनी वाई विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी भरघोस निधी प्राप्त करून दिला आहे. त्याचप्रमाणे ओझर्डे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी अडचणी समजून घेऊन त्यावर विकासाच्या रूपाने मात केली आहे. नामदार मकरंद आबांनी प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली आहे. या जिल्हा परिषद गटामधून मला मकरंद आबांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी मला ओझर्डे गटातील जनतेची सेवा करण्याचा संधी दिली आहे. त्यामुळे मला तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हवे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओझर्डे गटातील उमेदवार वृषाली ताई चव्हाण यांनी व्यक्त केले. नामदार मकरंद आबांनी जनसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणून विकास कामांची गंगा या मतदारसंघात राबवली आहे. नामदार मकरंद आबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यासाठी या जिल्हा परिषद गटातील जनतेच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत मी कटिबद्ध असून निधीच्या रूपाने ओझर्डे जिल्हा परिषद गटात विकासाचा डोंगर उभा करणार आहे. त्यामुळे विकासाची ही मालिका अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून मला आशीर्वाद द्यावेत. असे आवाहन वृषाली ताई चव्हाण यांनी केले. ओझर्डे जिल्हा परिषद गटातील प्रचार दौऱ्या दरम्यान खानापूर, लगडवाडी, मापरवाडी, वाकणवाडी या गावांमध्ये प्रचार दौरा करून जनतेच्या आशीर्वादा साठी त्यांनी साद घातली. यावेळी केंजळ गणातील उमेदवार शैलेश संकपाळ, ओझर्डे गणातील उमेदवार हर्षदा फरांदे, महादेव मस्कर, शशिकांत पवार, रामदास इथापे, उदयसिंह पिसाळ, किरण काळोखे, नवनाथ सोनटक्के,सर्जेराव पवार अमोल कदम यांसह ओझर्डे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.











