निरंजना न्यूज नेटवर्क
वाई (जि. सातारा) – वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या रोहित्र (डीपी) मधील तांब्याच्या तारा चोरी प्रकरणाचा वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने छडा लावला असून एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस निरीक्षक व तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चोरी झालेल्या रोहित्रांचे सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचणी येत होत्या; मात्र पथकाने सातत्यपूर्ण तपास करून आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
तपासादरम्यान फलटण येथील ३ व वाई येथील ३ अशा एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे ३०० किलो तांब्याची तार, गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी व १ चारचाकी वाहन तसेच ५ मोबाईल फोन असा एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयित अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
1. मुकेश माणिक जाधव (वय ४५, रा. मलठन,फलटण)
2 .अनिकेत सुभाष बनसोडे (वय २२.रा. मलठन,फलटण)
3. अर्जुन राजू जाधव (वय २०, रा. मलठन,फलटण)
4. रोहन लाखण घाडगे (वय २४, यशवंतनगर, वाई)
5. विजय बाबुराव शिंदे (वय ३६, रा. यशवंतनगर, वाई)
6. मनोज नामदेव घाडगे (वय ४०, रा. यशवंतनगर, वाई)
यापैकी आरोपी क्रमांक १ ते ३ हे सराईत गुन्हेगार असून, आरोपी क्रमांक २ व ३ यांना फलटण शहर पोलीस ठाण्यातून सातारा जिल्ह्यात तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या आरोपींकडून वाई पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण ७ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०३(२), ३२४(४) तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये गुन्हे नोंद आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षकवैशाली कडूकर व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकातील तपास पथकातील सह.पोलीस निरीक्षक श्री. अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर वाळुंज, पो. हवालदार अजित जाधव, पोलीस अंमलदार नितीन कदम, हेमंत शिंदे, विक्रम धोत्रे, श्रावण राठोड , विशाल शिंदे, मारुती लोलापोड, तसेच पोलीस पाटील संदेश वैराट व जनार्दन गोळे यांचा समावेश होता.या कारवाई साठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.











