उडतारे दि.23
भुईंज गटामध्ये दोन्ही पक्षाच्या दोन महिला निवडून आल्या.पण विजय असावा तर राणी कांतीलाल पवार यांच्यासारखा दिमाखदार असावा.कारण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सर्वसामान्य घरातील महिलेला मतदारांनी दिलेले मताधिक्य हे दिमाखदारच असून हा विजय पाचवड गणातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांचा असल्याचे प्रतिपादन ना.मकरंद पाटील यांनी केले
पाचवड गणातील उमेदवार सौ. राणी कांतिलाल पवार यांनी प्रचंड मतांनी विजय संपादन करत दिमाखदार यश मिळवले. त्यांच्या या भव्य विजयाबद्दल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.
पंचायत समिती पाचवड गणात सौ. राणी पवार यांच्या विरोधात प्रस्थापित घराण्यातील उमेदवार उभा असताना, सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. पाचवड गणातील मतदारांनी तब्बल १५०० मतांच्या आघाडीने त्यांना विजयी करून जनाधार दाखवून दिला.
सौ. राणी पवार यांचे पती श्री. कांतिलाल पवार यांचे स्वर्गीय लक्ष्मण तात्या पाटील यांच्या घराण्याशी असलेले सुमारे ४० वर्षांचे राजकीय संबंध, तसेच पंचक्रोशीत सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सातत्याने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या कामाची पावती म्हणूनच हा विजय मानला जात आहे.
यावेळी मंत्री मकरंद पाटील यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत, “सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन काम करा, लोकांचा विश्वास जिंका आणि विकासाच्या कामांना गती द्या,” असे आवाहन केले.
पाचवड गणातील या दिमाखदार विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी उडतरे गावच्या सरपंच अर्चना पवार,सुप्रिया पवार,अलका पवार,प्रविण पवार,आत्माराम सोनावाने,राजेंद्र सोनवणे,शिवाजीराव बाबर,सचिन पवार,प्रविण पवार,स्वप्नील निंबाळकर,मोहन पवार,प्रशांत शिंगटे,योगेश शिंगटे इ उपस्थित होते.











