निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
उडतरे दि.२१
उडतरे ग्रामपंचायत तर्फे सातारा जिल्हापरिषद चे नवनिर्वाचित सदस्य दिलीप बाबर आणि वाई पंचायत समिती सदस्य राणी पवार यांचा सत्कार करण्यात आला.
उडतरे गटात आणि गणात या निवडणुकीत प्रथमच हा ऐतिहासिक विजय पाहायला मिळाला .उडतरे गावातील पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी आणि जिल्हापरिषदेसाठी भारतीय जनता पक्ष असे दोन विरोधी पक्षाचे उमेदवार असून देखील दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले. ही निवडणूक उडतरे गावाने गट-तट बाजूला ठेऊन विकासकामे आणि विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्रित पणे हातात घेऊन गावचा एक आदर्श पॅटर्न दाखवून दिला.
उडतरे गटातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप बाबर यांनी ही निवडणूक यशस्वी रित्या जिंकून आल्याबद्दल उडतरे ग्रामपंचायतीने त्यांचा सन्मान केला यावेळी गावातील लोकांचे प्रश्न मार्गी लावुन गावात आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक कामे पूर्ण करणार असल्याचे त्यानी सांगितले . माझ्यासोबत प्रचारदरम्यान ना कोणता नेता ना आर्थिक पाठबळ असे असून गटातील लोकांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल आणि उडतरे गावाने सुधा ही निवडणूक हातात घेऊन जिल्हापरिषद आणि पंचायत समिती अशी दोन पदेएकत्रित रित्या मिळवल्याबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
दरम्यान नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य राणी पवार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला .त्यांनी गावातील आणि गणातील पाणी व्यवस्था, स्वचातगृह,रस्ते ,गटारे,इत्यादी कामांवर लक्ष देऊन गावाच्या विकासासाठी तत्पर असल्याचे सांगितले.राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील आणि खासदार नितीन काका पाटील यांच्या पाठिंब्यामुळे मी पाचवड गणातील विकासकामांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस प्रताप पवार ,ग्रामसेवक- मोहन कोळी,उडतरे गावाच्या सरपंच अर्चना पवार,माजी उपसरपंच मोहन पवार,सुप्रिया पवार,ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे,अश्विनी बाबर,सुरेखा जगताप,नारायण जाधव,प्रविण पवार,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रविण बाबर,विलास बाबर,स्वप्नील निंबाळकर,सुरेश पवार,शिवाजी बाबर,प्रदीप बाबर,राजेंद्र बाबर,दीपक पवार,किरण बाबर ,ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कुंभार,किशोर धुमाळ,माधुरी मोरे,सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
– उडतरे गावाने गट-तट ,राजकीय हेवेदावे बाजूला ठेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी जो पॅटर्न राबवला तो सर्वत्र लोक राबवतील.
– ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे
– यावेळी गावाने निवडणुक हातात घेऊन ज्या पद्धतीने दोन्ही उमेदवार निवडून आणले तसेच येणारी ग्रामपंचायत निवडणूक तरुण उमेदवारांच्या हातात देऊ आणि गावाच्या विकासासाठी निवडणूक बिनविरोध करू.
– मोहन पवार ,माजी उपसरपंच उडतरे











