निरंजना न्यूज नेटवर्क
वाई प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील नागेवाडी येथे कौटुंबिक वादातून दिराने आपल्या भावजयीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वाई तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागेवाडी येथील संबंधित कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून कुरबुरी सुरू होत्या. आज या वादाने उग्र रूप धारण केले आणि संतापलेल्या दिराने आपल्या भावजयीवर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखम झाल्यामुळे भावजयीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी तातडीने नागेवाडीत धाव घेतली आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी दिराला शिताफीने ताब्यात घेतले.
कौटुंबिक भांडणातूनच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या हत्येमागील नेमके नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
(बातमी मधील फोटो AI Genrered आहे)











