इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; वाई तहसीलदारांचे नागरिकांना आवाहन


निरंजना न्यूज नेटवर्क

तालुकास्तरावर ‘नियंत्रण कक्षा’ची स्थापना; तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीरवाई दि. १४ : जागतिक परिस्थिती आणि इंधन पुरवठा साखळीवर निर्माण झालेला संभाव्य ताण लक्षात घेता, वाई तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा. इंधनाचा तुटवडा भासणार नाही याची प्रशासन पूर्ण काळजी घेत असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईच्या चर्चांमुळे अनेक नागरिक भीतीपोटी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी (LPG) सिलिंडरचा अतिरिक्त साठा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि संपूर्ण वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी वाई तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेमार्फत ‘तालुका नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे.
नागरिकांना इंधन पुरवठ्याबाबत काही तक्रार असल्यास किंवा अधिकृत माहिती हवी असल्यास, कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५) ९६३७९११६९९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सतत पाठपुरावा करत आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा.
इंधनाचा साठा मुबलक असून, विनाकारण गर्दी करून टंचाईची परिस्थिती ओढवून घेऊ नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


73
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!