*उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांना पाचवड ता. वाई येथे साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पण*


प्रतिनिधी – निलेश बाबर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच भुईंज, पाचवड परिसरात शोककळा पसरली. या दुर्घटनेने सर्वसामान्य नागरिकां पासून राजकीय कार्यकर्त्यां पर्यंत सर्वांना मोठा धक्का बसला. अजित दादांना श्रद्धांजली म्हणून पाचवड, भुईंज येथील बाजारपेठ तात्काळ बंद ठेवण्यात आली. या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार तात्काळ थांबवला गेला. राजकारणा पलीकडे जाऊन मानवी संवेदन शीलतेचे दर्शन घडवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अजित दादांच्या प्रतिमेला पाचवड येथे पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला. अजितदादांचे राज्याच्या राजकारणातील योगदान त्यांची कार्य तत्परता आणि सामान्य जनतेशी असलेल्या थेट संपर्क याची आठवण काढताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. राज्याचे अनुभवी आणि कणखर नेतृत्व गमावले अशी भावना यावेळी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषद भुईंज गटाचे अधिकृत उमेदवार प्रमोद दादा शिंदे यांनी भावना व्यक्त केली. या कठीण प्रसंगी अजितदादांच्या कुटुंबाप्रती पाचवड परिसरातील नागरिक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संवेदना व्यक्त केल्या. अजितदादांच्या आत्म्यास ‘चिरशांती लाभो’ अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी भुईंज पंचायत समिती गणाच्या उमेदवार शितल वारागडे, पाचवड पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ राणी कांतीलाल पवार, पाचवड चे सरपंच बंडानाना गायकवाड, शामराव गायकवाड, उद्योजक प्रमोद वारागडे, भुईंज चे उपसरपंच शुभम पवार ,अजित शेवाळे,कांतिलाल पवार,अनिल पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!