प्रतापगड उत्सव समितीच्या संस्थापिका, वाई येथील हिंदुत्ववादी चळवळीचा आधारस्तंभ, मातेसमान व्यक्तिमत्त्व असलेल्या वैकुंठवासी विजयाताई भोसले यांचे आज निधन झाले.
विजयाताई भोसले उर्फ ननी या सर्वांवर मुलासारखं प्रेम करणाऱ्या, कोणताही भेद न करता मायेची ऊब देणाऱ्या होत्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, संस्कार आणि मायेचं जिवंत उदाहरण होतं.
प्रतापगड उत्सवाच्या माध्यमातून विजयाताई भोसले उर्फ ननी यांनी पिढ्यान्पिढ्या इतिहास, संस्कृती आणि हिंदुत्वाची जाणीव समाजात रुजवली. त्यांचं कार्य केवळ आयोजनापुरतं मर्यादित न राहता समाज घडवण्याचं, माणसं जोडण्याचं आणि मूल्य जपण्याचं कार्य ठरलं.
Views: 1,699











