निरंजना न्यूज
(सत्यासाठी निडर – जनतेसाठी कटिबद्ध) संपादक – निलेश बाबर

उडतरे दि – ०९-११-२०२५
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील उडतरे, पाचवड, वीरमाडे, कळंभे, भुईंज परिसरातील नागरिकांच्या स्थानिक घडामोडींना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘निरंजना न्यूज’ या डिजिटल न्यूज पोर्टलची आज अधिकृत सुरूवात झाली.
स्थानिक पत्रकारितेतून ग्रामीण भागातील प्रश्न, विकास कामे, अपघात, शेती, बाजारभाव, निवडणूक आढावा, शिक्षण, क्रीडा, संस्कृती यासह महत्त्वाच्या घडामोडींचे वेगवान आणि निष्पक्ष रिपोर्टिंग करण्याचा या पोर्टलचा प्रामाणिक प्रयत्न असेल.
पोर्टल सुरू करण्यामागे प्रमुख उद्दिष्ट
🔹 सामान्य नागरिकांचा आवाज प्रशासना पर्यंत पोहोचवणे.
🔹 ग्रामीण बातम्यांना योग्य प्राधान्य देणे 🔹स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार आवाज उठवणे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुर्दशा, पाण्याची टंचाई, वाहतूक कोंडी, तरुणांसाठी रोजगाराची कमतरता अशा समस्या गंभीर आहेत. या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर चर्चा घडवून आणून सकारात्मक बदल घडवणे हे पोर्टलचे ध्येय असल्याचे संपादकीय मंडळाकडून सांगण्यात आले.
याशिवाय, परिसरात होणारे चांगले उपक्रम,विकास कामे , सामाजिक -राजकीय कार्य, विद्यार्थ्यांची कामगिरी, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती, स्थानिक व्यावसायिक आणि उद्योगांची प्रगती यांना देखील योग्य स्थान देण्यात येणार आहे.
निरंजना न्यूज पोर्टलमुळे ग्रामीण भागातील माहिती आता सर्वसामान्यांपर्यंत ऑनलाइन माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे.
— निरंजना न्यूज,
उडतरे, वाई तालुका, सातारा











