निरंजना न्यूज नेटवर्क- प्रमुख संपादक निलेश बाबर
(पाचवड वार्ताहर – संजय भाडळकर)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान वाई तालुका नेहमीच l अग्रेसर भूमिका बजावत आहे वाई तालुक्याने आतापर्यंत लोकसहभागातून व श्रमदानातून प्रत्येक मंगळवारी अनेक उपक्रमराबवले आहेत त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक अकरा रोजी वाई तालुक्यात श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याबाबत सर्व ग्रामपंचायत यांना आवाहन करण्यात आले होते त्यानुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये वनराई बंधारे बांधकामाचे नियोजन करण्यात आले होते
मुख्य कार्यकारी अधिकारी . याशानी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 11 रोजी बंधाऱ्याच्या निर्मितीची मोहीम राबविण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्व गावांमध्ये वनराई बंधाऱ्याच्या निर्मिती करणे कामे गावातीलआबाल वृद्ध ग्रामस्थ तसेच काही ठिकाणीशाळा हायस्कूल महिला मुले सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले वाई तालुक्यातील हे लोकसहभागाचे व श्रमदानाचे आठवे पुष्प होते
तालुक्यातील पसरणी किकली बोपर्डी परखंदी मेनवली वयगाव व्याजवाडी उडतारे खडकी अभेपुरी अनवडी खानापूर ओझर्डे , गुळूंब,निकम वाडी भुईंज कवठे,लोहारे व्ह्याळी, खावली इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली तालुक्यतील या उपक्रमाचे मंत्री मकरंद आबा पाटील यांनी विशेष कौतुक केले तर या यशस्वी अभियानाच्या अंमलबजावणी साठी तालुक्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्यासह गटविकास अधिकारी बाळासाहेब जाधव तसेच कृषी अधिकारी शांताराम गोळे विस्तार अधिकारी नारायण पवार अशोक भालेराव व पंचायत विस्तार अधिकारी रुपेश मोरे राहुल हजारे शरद गायकवाड आणि सर्व ग्रामपंचायतांचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले











