निरंजना न्यूज नेटवर्क-निलेश बाबर( मुख्य संपादक )
वाई तालुक्यातील देगाव, शिरगाव तर कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्कलवाडी, राऊतवाडी, अनपटवाडी या गावांमध्ये डोंगराचा भाग मध्यभागी असल्याने दोन्ही बाजूचे शेतकरी आपापली जनावरे चारण्यासाठी डोंगर माथ्यावर सोडतात . दरम्यान सर्कलवाडी भागातील काही शेतकरी गुरांना चारण्यासाठी गेले असता, बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ल्या केल्याची घटना नुकतीच घडली असून या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सर्कलवाडी येथील शेतकरी नेहमीप्रमाणे डोंगर माथ्यावर जनावरे चारण्यासाठी गेले होते. याच दरम्यान एका वासरावर बिबट्याने अचानक हल्ला चढवल्याने या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला. मात्र, यामुळे परिसरातील भागातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शेतकरी जनावरे बांधून ठेवत आहेत .शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. महिला मजुर , शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी सुद्धा दिवसा जाणे टाळत आहेत. या ठिकाणी वाघाची इन्ट्री झाल्याने नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. शेतात काम करणे तर दूर आता गावातही सुरक्षित वाटत नसल्याने ते संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचा व जनावरांचा जीव घेणारा हा नरभक्षक वाघ आता गावाच्या वेशीवर आल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीची सावट अधिकच गडत झाले आहे. वाई तालुक्याचा पूर्व भागातील देगाव, शिरगाव व कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील सर्कलवाडी, अनपटवाडी, राऊतवाडी यांना असणारा डोंगरमाथा हे एकमेकांच्या शिवधड्या आहेत. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीसह पशुपालन आहे. त्यामुळे गावातील गुराखी आपल्या जनावरांना चारण्यासाठी घेऊन वनक्षेत्रात जातात. मात्र, आता या ठिकाणी वाघ आल्याने गुराख्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे ते आपल्या जनावरांची विशेष काळजी घेत आहेत. या वनपरिक्षेत्रात वाघाने गाईच्या वासराची शिकार केल्याने या भागातील गुराखी चिंताग्रस्त झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाला तात्काळ वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वनविभागाने सुद्धा या बिबट्यावर ट्रॅप कॅमेरा द्वारे सतत नजर ठेवून वाघ कोणत्या दिशेने हालचाल करत आहे. हे पाहणे गरजेचे आहे. या वनपरिक्षेत्रात वाघ आढळल्यानंतर वनविभागाने या गावांमध्ये शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना विशेष म्हणजे गावातील अनेकांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळण्यास सांगितले असून खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वनविभागाचे काळजी घेण्याचे आवाहन*– डोंगरांमध्ये बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे. तरी सर्व शेतकरी वर्ग व ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी तसेच बिबट्या कुठे दिसून आल्यास वनविभागीय अध्यक्ष अमोल काटकर यांच्याशी संपर्क साधा व सर्वांनी सावधानगी बाळगावी व काळजी घ्यावी असे आवाहन वनविभाग अधिकारी अमोल काटकर यांनी केले आहे.











