निरंजना न्यूज ,उडतरे दि-०९-११-२०२५
मी लोकांना कर्तव्यातून सेवा दिली लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं यातूनच कायदा व सुव्यवस्था राखत परिसराचे अनेक प्रश्न सोडवण्यात यश लाभले सातारा जिल्हा पोलीस दल नेहमीच विधायक उपक्रम राबवत जनतेशी सुसंवाद साधत असते याहि पुढे हि परंपरा अशीच सुरू राहिल असे प्रतिपादन भुईंज पोलीस स्टेशनचे मावळते प्रभारी अधिकारी व सातारा सायबर विभागाचे अधिकारी रमेश गर्जे यांनी केले.
भुईंज पोलीस स्टेशनच्या प्रांगणात सपोनि रमेश गर्जे यांचा निरोप समारंभ व नुतन प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांचे स्वागत व गणराया आवार्ड पारितोषिक वितरण सोहळा असा संयुक्त समारंभात सत्काराला उत्तर देताना सपोनि रमेश गर्जे बोलत होते. यावेळी कार्यक्षेत्रातील विविध गावांचे पक्षांचे पदाधिकारी पोलिस पाटील व गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी बोलताना रमेश गर्जे पुढे म्हणाले की महामार्गावरील भुईज पोलीस स्टेशन हे एक आदर्श व काम करणा-या अधिकारी कर्मचारी यांना नेहमीच आव्हान म्हणून खुणावत असते इथे निसर्ग सौदर्याबरोबरच धावणारा महामार्ग व नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे प्रत्येक गावात पोहचता येते तीन वर्षाच्या कालखंडात जुनी पोलीस गाडी (आऊट पोष्ट) यांच्या नुतनीकरणासह संरक्षक भिंत नविन पोलीस स्टेशनच्या आवारात सहाय्यक अधिकारी कक्ष महिलांच्यासाठी स्वतंत्र इमारत आणि स्वच्छतागृह आदी बांधण्यात मला सर्वाच्या सहकार्यामुळे शक्य झाले उर्वरित मंजूर कामे नुतन अधिकारी मार्गी लावतीलच त्यासाठी तुम्ही सर्वानी त्यांना सहकार्य करावे अशी भावना व्यक्त केली.
प्रारंभी गणराया आवार्डचे विजेते व एक गाव एक गणपती उपक्रमातून गाव निहाय मंडळांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देवून गौरव करण्यात आला याप्रसंगी दोन्ही अधिकारी यांचे उपस्थितांच्यावतीने सत्कार करण्यात आला. वेळे गावचे माजी सरपंच दशरथ पवार, उपसरपंच राहुल ननावरे,पाचवड सरपंच महेश उर्फ बंडानाना गायकवाड, भाजपा नेते गजानन भोसले, पोलीस पाटील संघटनेचे दिपक गिरी गोसावी व राजेंद्र चव्हाण, प्राचार्य आर. एस. पाटील, पत्रकारांच्या वतीने जयवंत पिसाळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
स्वागत पीएसआय पतंग पाटील यांनी केले तर आभार पीएसआय सुरज शिंदे यांनी मानले.











