पाचवड च्या सनई चे सूर उमटले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर* *स्टेच्यु ऑफ युनिटी कार्यक्रमात सहभाग*


निरंजना न्यूज नेटवर्क ,उडतरे

३१ ऑक्टोबर हा दिवस देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गुजरात मधील स्टेच्यु ऑफ युनिटी एकता नगर केवडीया येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याच कार्यक्रमात सुंद्री संबळ वादन हे पथक खास आकर्षण ठरले. याच पथकात पाचवड तालुका वाई येथील प्रसिद्ध सनई वादक अभिजित जाधव व केदार जाधव हे बंधू सहभागी झाले होते. त्यांचे सादरीकरण व प्रेक्षकांची वाहवा यामुळे लोकप्रिय ठरलेल्या या पथकाचे व जाधव बंधूंचे विशेष कौतुक स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत चौकशी केली.
अभिजित व केदार हे दोघेही बंधू जुन्या पिढीतील नामवंत सनई वादक सीताराम जाधव यांच्या शिकवणीतून व संस्कार झालेल्या पिढीजात परंपरा जपत हे बंधूनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट व मालिकेत सनई वादनाचे काम केले आहे
आता थेट त्यांनी आपली कला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सादर करून मिळवलेले कौतुक सर्वत्र अभिमानास्पद ठरत आहे. लवकरच त्यांचा नागरी सत्कार समारंभ पांचवड गावाचे सरपंच महेश उर्फ बंडानाना गायकवाड व भुईंज प्रेस क्लबच्या वतीने होणार असल्याचे जेष्ठ पत्रकार जयवंत पिसाळ यांनी सांगितले आहे.


86
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!