मुख्यमंत्री समृधराज पंचायत अभियान अंतर्गत आयोजित श्रमदानस कळंभे ग्रामस्थांचा मोठा सहभाग.


निरंजना न्युज-निलेश बाबर

कळंभे- पंचायत समिती वय व जिल्हा परिषद सातारा यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, गटविकास अधिकारी श्री परीट साहेब व सर्व अधिकारी यांचे सूचनेनुसार ग्रामपंचायत कळंभे ता वाई यांचे आवाहनास प्रतिसाद देवुन शनिवार दिनांक १५/११/२०२५ रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी ५-०० या वेळेत कळंभे गावातील स्वयंसेवक,महिला व शिवसह्याद्री महिला ग्रामसंघातील सर्व बचतगटाच्या पदाधिकारी, सदस्या, लहान मुले यांनी एकत्र येऊन कळंभे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय परिसर स्वच्छता करून, नवीन गावठाण येथील ओढ्यावर दोन पाणी साठवण बंधारे बांधले तसेच लोकसहभाग, शेतकरी यांनी स्वेच्छेने लोकवर्गणी देऊन कळंभे गावचे शिवारातील दळे- बाराबिघा चारीचा पाणंद रस्ता वाहतूक योग्य केला.सदरील पाणंद रस्त्यांच्या डागडुजी करून शेतमाल वाहतूक योग्य करणेकामी कळंभे गावातील जेसीबी मशीन मालक श्री.संदिप वाघ यांनी त्यांचे मशिन,ट्रँक्टर मालक श्री विकास संभाजी शिवथरे,श्री.प्रमोद बळवंत गायकवाड,श्री.विलास बाजीराव गायकवाड, श्री.प्रकाश निवृत्ती बाबर , सोसायटी सचिव श्री बाबासो गायकवाड यांनी देखील रस्त्याचे भराव्या करीता मोफत वाहन देवुन श्रमदानात सहभाग नोंदवला.
सदरील सर्व उपक्रम राबविण्यात अपेक्षेप्रमाणे गावातील पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग लक्षवेधी असुन महिला बचत गटाच्या सर्व सदस्या, पदाधिकारी,अध्यक्ष, मार्गदर्शक यांचे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार्या व प्रत्यक्ष सहभागी स्वयंसेवक यांचे आभार.सदर अभियान हे आणखी एक महिना सुरू राहणार असुन यापुढे देखील दर आठवडा अथवा पंधरवड्यात आणखी तीन पाणीसाठवण बंधारे गावातील ओढ्यावर पाणी साठवण बंधारे,पाणंद रस्ते,गावची सार्वजनिक स्वच्छता,गावचे सुशोभीकरण, वृक्षलागवड, हरीत प्रवेशद्वार असे विविध उपक्रमात नागरिकांनी श्रमदानात सहभाग नोंदवावा.तसेच हे सर्व उपक्रम राबवताना लोकवर्गणी व लोकसहभाग अंत्यंत आवश्यक आहे.तसेच गावातील मिळकत दार यांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी चा संपूर्ण भरणा ग्रामपंचायत कार्यालय कळंभे येथे करावा असे आवाहन सरपंच सौ निलम शिवथरे, उपसरपंच सौ शकुंतला चव्हाण, ग्रामविकास अधिकारी श्री.रघुनाथ भोईर यांनी केले आहे.
सदर महाश्रमदानास कळंभे गावच्या आदर्श सरपंच ज्योती गायकवाड, माजी सरपंच सौ.सारिका गायकवाड ,माजी उपसरपंच श्री.आबाजी सुतार, ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रीय उत्कृष्ट उपसरपंच श्री.प्रकाश बाबर,आशा वर्कर सौ.साधना गायकवाड ,सीआरपी सौ. नुतन बाबर,कृषी सखी सौ.उल्का शिवथरे, शिवसह्याद्री महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ.दिपीका प्रदीप शिवथरे , महात्मा गांधी महिला तंटामुक्ती समिती अध्यक्षा सौ सीमा जाधव, कळंभे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ अश्विनीताई वाघ,प्रगतशील शेतकरी श्री.नितीन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते श्री.दिनकर आबा शिवथरे,श्री.अमित चव्हाण,जेष्ठ मार्गदर्शक श्री.दिनकर शिवथरे(गांधी बापु),श्री.नारायण जाधव,श्री.गोपाळभाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते श्री.शिवाजी सुभाष वाघमारे,आजी-माजी सैनिक संघटना कळंभे चे अध्यक्ष श्री.तुषार आप्पासो गायकवाड,सोसायटीचे माजी चेअरमन श्री.तानाजी शिवथरे व कळंभे गावातील सर्व महिला बचत गटांच्या सक्रिय सदस्या व अध्यक्ष उपाध्यक्ष सौ.माधुरी दिलीप वाघसौ.शितल संदिप शिवथरे,सौ. सविता रोहिदास गायकवाड ,सौ.वनिता कालिदास पवार,सौ.निवेदिता सागर सुतार ,सौ.ज्योती धनंजय नलवडे ,सौ.मनीषा शरद पनवेलकर ,सौ.शोभा दिलीप शिवथरे ,सौ.कमल राजाराम पनवेलकर,सौ. छाया नंदकुमार शिवथरे ,सौ.कविता गोपाळ गायकवाड ,सौ.रुक्मिणी हनमंत शिवथरे ,सौ.सुषमा नितीन वाघमारे,सौ मंगल सुभाष वाघमारे, ताराबाई मारुती बाबर,कुसुम निवृत्ती बाबर,सौ.प्रेमा विनोद सोनमळे,सौ.सुषमा मनोरंजन वाघमारे,सौ.वनिता विजयकुमार शिवथरे,सौ.अश्वीनी नितीन शिंगटे,श्री.दिलीप सर्जेराव वाघ, सौरभ संजय गायकवाड, स्वराज प्रकाश बाबर, साईराज अमित चव्हाण,कबीर संजय गायकवाड, स्वयंभु विकास बाबर व इतर ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
सदरील अभियान यशस्वी करणेकामी तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या वरीष्ठ अधिकारी यांना कळंभे गावातील महिलांकडुन फार मोठे काम करत असल्याने विशेष कौतुक व आणखी चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे.गावातील सर्व महिला उपक्रमात सहभाग नोंदवुन करत असलेल्या श्रमदान व लोकसहभाग याबद्दल सहभागी सर्वाचे कळंभे ग्रामपंचायतीकडून आभार मानण्यात आले.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!