*किसनवीर कारखान्यावरून शिवाजीराव बाबर आक्रमक; मकरंद पाटलांवरील टीकेला दिले प्रत्युत्तर*


निरंजना न्यूज नेटवर्क-निलेश बाबर 

जे स्वतः किसनवीर कारखान्याचे संचालक होते, त्यावेळी कोणती अक्कल गहाण ठेवून ते सत्तेतून बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांची उंची मोजू नये अन्यथा त्यांचा खरपूस समाचार घेतला जाईल असे प्रतिपादन शिव प्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव बाबर यांनी केले. याबाबत बोलताना शिवाजीराव बाबर म्हणाले की, शेतकरी सभासदांच्या हितासाठी इच्छा नसतानाही नामदार मकरंद पाटील व त्यांचे बंधू नितीन काका पाटील यांनी किसनवीर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला. कारखान्यावर असणारा हजार कोटीचे कर्ज कोणत्या पद्धतीने फेडायचं अशा अनेक व विविध बाबी अडचणीच्या असताना सुद्धा फक्त कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कारखाना त्यांनी ताब्यात घेतला. मात्र कारखान्यावर होत असलेली घुसमटबाजी व त्या ठिकाणी असलेला अनागोंदी कारभार जुन्या काळात झालेला त्या संदर्भात आत्तापर्यंत सर्व बँकांची कर्जे निल केली आहेत. कारखाना व्यवस्थापनाकडून कोणताही अतिरिक्त भत्ता न घेता, तसेच जेवण, चहा व प्रवासासाठी वाहनांचा वापर स्वतःच्या खर्चातून केला जात आहे.
कामकाजाच्या निमित्ताने होणाऱ्या दौऱ्यांसाठी किंवा बैठकींसाठी अतिरिक्त खर्चाचा भार कारखान्यावर पडू नये, यासाठी वैयक्तिक खर्चातून व्यवस्था केली जात असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले.सध्या स्थितीत फक्त दोन पतसंस्था व दोन बँका ची कर्ज थकीत आहेत. ती सुद्धा लवकरात लवकर कमी केली जातील व येऊ घातलेल्या काळामध्ये कारखाना सुव्यवस्थित राहील असे आश्वासन मकरंद आबा व नितीन काकांनी दिल आहे. त्यांच्यावर सर्व शेतकरी सभासदांचा विश्वास आहे. जे नामदार मकरंद पाटील यांच्यावर टीकाटिप्पणी करत आहेत त्यांनी स्वतःची उंची पहावी स्वतः आपण किसनवीर कारखान्याचे संचालक होता त्या दरम्यान आपण काय दिवे लावलेत स्वतःच्या स्वार्थासाठी त्यावेळी किती आकडेमोड करून आपण गाव व तालुका सोडून सातार मध्ये स्थायिक झालात. व त्यानंतर आता उडतारे गावामध्ये असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघा मधून आपण किती गदारोळ करत आहात. आपल्या पाठीमागे कोणताही कामगार कुठलाही गावचा नागरिक नसताना स्वतःला काहीतरी मिळावं या अनुषंगाने जी उठाठेव चालू आहे ती पोटाची खळगी भरण्यासाठी आपण किती आकडेमोडी मागणार आहात हे आपण स्पष्ट करावं अन्यथा इथून पुढे नामदार मकरंद आबा व नितीन पाटील यांच्यावर जर कोणताही आरोप केला तर आपला खरपूस समाचार घेतला जाईल असे उद्गार शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव बाबर यांनी केले आहेत.
गेल्या महिन्याभरापूर्वी सामाजिक कार्यकर्ते जयवंत निकम व प्रवीण बाबर यांनी किसनवीर कारखान्या वरती व्यवस्थापनाशी भेट घेतली होती. दरम्यान जयवंत निकम यांनी व्यवस्थापनाची चर्चा करून अडिअडचणी समजून घेतल्या त्या नंतर प्रवीण बाबर यांनी जयवंत निकम यांच्यावर अशी टीका टिप्पणी केली की जयवंत निकम यांनी व्यवस्थापनाशी आकडेवारी घेऊन सेटलमेंट केल्याचा आरोप त्यांच्यावर केला असता जयवंत निकम यांनी सर्व आरोप फेटाळले असून मी स्वतः वाई तालुक्यासाठी झटत असून मला कुठल्याही रुपयाची अपेक्षा नाही ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी समोरासमोर यावे व माझ्याशी चर्चा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!