गावातील यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

उडतरे : दिनांक २९ मार्च रोजी रविवारी रात्री १२ वाजता दंडस्थान कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर ३० मार्च रोजी देवाचा छबिना रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत काढण्यात येणार आहे. या छबिन्यात दानपट्टा,लेझीम, ढोल, ताशा पथक, हलगी ,तसेच पारंपरिक वाद्यांचा समावेश असणार आहे. तसेच विविध देखावे सादर करण्यात येणार असून, शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी यात्रेतील आकर्षण ठरणार आहेत.

याशिवाय, सुयोग्य संचलन व पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील युवक व विविध संस्था पुढाकार घेत आहेत. फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात येणार आहे, ज्यामुळे वातावरण अधिक रंगतदार होणार आहे.

दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सौ.गीतांजली सातारकर यांचा तमाशा कार्यक्रम तसेच सायंकाळी ४ वाजता जंगी कुस्त्यांचे आयोजन केलेले आहे. त्यानंतर १ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता रवि जाधव यांचा ३६ नखरेवाली हा ऑर्केस्ट्रा आयोजित केला आहे.यांनतर यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.

गावातील सर्व नागरिकांनी काळेश्वर देवाच्या यात्रेला आणि कार्यक्रमांना उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन काळेश्वर यात्रा कमिटी यांच्याकडून करण्यात आले आहे.


86
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!