कळंभे येथे २०० वृक्षांचे भव्य वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश


उडतरे , दि. २६(प्रतिनिधी)निलेश बाबर

– महाराष्ट्र शासन, पंचायत समिती वाई आणि ग्रामपंचायत कळंभे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कळंभे (ता. वाई) येथे भव्य वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या अभियानांतर्गत गणपतीचा माळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंभे तसेच वैकुंठ स्मशानभूमी परिसरात विविध जातींच्या २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या सौ. राणीताई पवार (पाचवड गण) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका कृषी अधिकारी शांताराम गोळे, विस्तार अधिकारी पवार साहेब तसेच पंचायत समिती वाईच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षलागवड ही केवळ औपचारिकता न राहता प्रत्येक लावलेल्या वृक्षाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमात कळंभे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांच्या सहभागामुळे वृक्षारोपण अभियान यशस्वीरीत्या पार पडले.

कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आयोजकांनी आभार मानले.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!