निरंजना न्यूज- निलेश बाबर
किसनवीर आबांनी कष्टाने उभा केलेला कारखाना भंगारात चालला असताना नामदार मकरंद आबांनी कारखान्याचे गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून शेतकरी सभासदांना ऊर्जा अवस्थेत आणण्याचे काम केले. ना. मकरंद आबांनी वाई तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा विकासाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. भंगारात चाललेला कारखाना आबांनी सभासदांच्या हितासाठी घेऊन कारखान्याला ऊर्जा अवस्थेत आणून सभासदांचे हीत जोपासण्याचे काम आबांनी केलं आहे. ऊस उत्पादक सभासदांना न्याय देण्याचं काम नामदार मकरंद आबांनी केलं त्यामुळे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एक दिलाने एकजुटीने काम करून मकरंद आबांना कामाची पोच पावती द्या असे आवाहन भुईंज जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रमोद (दादा) शिंदे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ भुईंज चे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी संपन्न झाला. या शुभारंभ कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास भुईंज पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. शितल प्रमोद वारागडे, पाचवड पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. राणी कांतीलाल पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार, किसनवीर कारखान्याचे कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे, संचालक रामदास इथापे, युवा नेते सुधीर (आबा) भोसले पाटील, राजू काका भोसले, कुमार बाबर, दीपक बाबर, यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रमोद शिंदे म्हणाले की, जो नेता कार्यकर्त्यांसाठी रात्र दिवस झगडतो कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो. वाडी वस्त्यावरती विकासाची कोटयावधीची कामे करतो अशा नेत्याच्या पाठीशी राहणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी स्वतः तुम्ही उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे आहात असे समजूनच कामाला लागण्याच्या सूचना प्रमोद दादा शिंदे यांनी केल्या. यावेळी भुईंज पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. शितल वारागडे, या म्हणाल्या की, मी भुईंज गावची सून व लेक आहे. त्यामुळे भुईंज करांच्या ज्या कोणत्या अपेक्षा असतील त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी मी पेलणार आहे. कधीही काळया रात्रीची हाक मारा तुमच्यासाठी मी सदैव कार्यरत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी कुमार बाबर, सुधीर भोसले पाटील, अजित शेवाळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश धुरगुडे यांनी केले. तर आभार राजू काका भोसले यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास भुईंज चे उपसरपंच शुभम पवार, पै. प्रकाश पावशे, सुनील शेवते, प्रशांत भोसले- पाटील, भरत भोसले, नारायण नलावडे, चरण गायकवाड, विजय भोसले, संतोष बाबर, लक्ष्मण वारागडे, शशिकांत दगडे, महेश भोसले, विजय बाबर, दिनेश बाबर, सचिन बाबर,उडतरे येथील सचिन पवार,सुशील पवार,मा.उपसरपंच मोहन पवार,अर्चना पवार,सुप्रिया पवार, आदी कार्यकर्ते आणि महिला बहुसंख्येने उपस्थित होते.











