*उडतरे पाचगणी रस्त्यावर धूम रायडरचा धुमाकूळ* *भरधाव वेगाने गाडी चालवताना अपघाताचा धोका* *उडतरे गावातील नागरिक भयभीत*


निरंजना न्यूज नेटवर्क-निलेश बाबर

उडतरे पाचगणी कडे जाणाऱ्या रोडवरून धुम स्टाईल बाईक पळणाऱ्या कडून गत दिवसभरात उडतरे गावातून धुमाकूळ घातला असून त्यांच्या स्टंटबाजीचा गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याने नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गत कित्येक दिवसांपासून उडतरे ते पाचगणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू आहे. मात्र, उडतरे गावातून पाचगणी कडे जात असताना गावांमध्ये असणाऱ्या अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे.ज्ञ दरम्यान आज दिवसभरात 200 च्या आसपास बाईक रायडर्स भरधाव वेगाने उडतरे गावातून पाचगणी कडे रवाना झाले आहेत. मात्र, त्यांची ही जीवघेणी स्पर्धा गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनली असून याकडे संबंधित पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे गरजेचे ठरले आहे.तक्रारी अर्ज करून ही अधिकाऱ्यांनी दखल घेण्याऐवजी हे काम कुणाचे आणि कुणी दखल घ्यायची यासंदर्भात ग्रामस्थांनी कुणाकडे मागणी करावी याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!