निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
दि – १९
उडतरे -पाचगणी रोड वर नेहमीच होत असलेल्या वाहतूक कोंडी मुळे ग्रामस्थ हैराण असताना काल दि १८ रोजी पाचगणी कडे जाणाऱ्या बायकर्स च्या गाड्यांमुळे उडतरे गावातील ग्रामस्थ पूर्ण भयभीत झाले होते.त्यांचे स्पीड आणि कर्णकर्कश हॉर्न आणि निष्काळजी पणे केलेले ड्रायव्हिंग मुळे गावातील वातावरण संतप्त झाले होते.
भुईंज पोलिस स्टेशन चे API पृथ्वीराज ताटे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने उपाययोजना करून देण्याचे सहकाऱ्यांना आदेश दिले.
यावेळी भुईंज पोलिस स्टेशन चे बिट अंमलदार अमोल सपकाळ,
भुईंज पोलिस स्टेशन चे ट्राफिक हवालदार सुशांत धुमाळ,कन्स्टेबल रोहन चव्हाण,कन्स्टेबल अजित चव्हाण यांनी बॅरिकेट्स लाऊन वाहतूक नियंत्रित करण्यास प्रयत्न केले.
दरम्यान ग्रामपंचायती तर्फे गावातील अरुंद रस्ता ,शाळेतील जाणारी मुले आणि गावातील ग्रामस्थ यांना होणाऱ्या अडचणी तसेच छोटेमोठे होणारे अपघात आणि वादाचे प्रसंग यासंदर्भात पर्यटकांना पर्यायी मार्ग दर्शवणारे सूचना फलक लावण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.











