उडतरे येथे संविधान दिन उत्साहात साजरा – ग्रामपंचायत सदस्यांचा संविधान मूल्य जपण्याचा संकल्प


निरांजांन न्यूज नेटवर्क-निलेश बाबर

दिनांक 26 नोव्हेंबर – संविधान दिना निमित्त उडतरे ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी, महिला मंडळ, आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या संविधानातील मूल्यांचे पालन करण्याचा सर्वांनी संकल्प केला.
यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी नागरिकांना संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाहीतील ग्रामपंचायतीची भूमिका याबाबत मार्गदर्शन करून ग्रामपातळीवर पारदर्शक व सर्वसमावेशक विकास घडवण्याचे आपले कर्तव्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण व ग्रामस्वच्छतेची शपथ घेण्यात आली. संविधानाने दिलेल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून समाजहितासाठी कार्य करण्याचा निश्चय उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी उडतरे गावाच्या सरपंच अर्चना पवार,ग्रामपंचायत सदस्य सुरेखा जगताप,नारायण जाधव,राहुल शिंदे,ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग संतोष कुंभार ,ऑपरेटर माधुरी मोरे,किशोर धुमाळ आशा सेविका हर्षदा चव्हाण,कोमल शेडगे,कल्याणी बाबर,अंगणवाडी सेविका मीना कांबळे,सविता बाबर,रेखा जाधव,जयश्री जगताप,पूजा पवार हे उपस्थित होते.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!