राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उडतरे येथील वैष्णवी जगताप हिला सुवर्णपदक


निरंजना न्यूज नेटवर्क-निलेश बाबर,उडतरे

हैदराबादयेथे झालेल्या २५ व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत वैष्णवी जगताप हिने सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. तिने ५० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर फ्रीस्टाईल, ४ बाय १०० फ्रीस्टाईल रिले आणि ४ बाय १०० मेडले रिले या प्रकारांत सुवर्णपदक पटकावले, तर ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.

यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे झालेले राज्यस्तरीय पॅरा स्पर्धेत तिने ५० मीटर, १०० मीटर फ्रीस्टाईल आणि ५० मीटर बॅकस्ट्रोक या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्या कामगिरीच्या जोरावर तिची राज्य संघात निवड झाली होती. उडतरे गावची कन्या असलेले वैष्णवी ही जन्मतः दिव्यांग आहे. तिने जलतरण हे थेरपी म्हणून सुरू केले होते. आत्तापर्यंत तिने आशियाई

पॅरा स्पर्धा २०२३, कॉमनवेल्थ स्पर्धा २०१८ यामध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे, तसेच ११ व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत ३० हून अधिक सुवर्णपदके मिळून दिली आहेत. उडतरे येथील नारायण परबती जगताप यांची नात असलेली व विनोद जगताप यांची कन्या असलेल्या वैष्णवीला राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविले आहे. राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेतील कामगिरीचे तिचे उडतरे ग्रामस्थांकडून आणि सर्वत्र कौतुक होत आहे.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!