निरंजना न्यूज नेटवर्क- निलेश बाबर
कदमवाडी ओझर्डे तालुका वाई येथे श्री स्वामी समर्थ मठ येथे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पं.पु. नंदगिरी महाराज मठाधिपती शनेश्वर देवस्थान सोळशी, कोल्हापूर येथील श्री स.स. आनंद काडसिद्धेश्वर स्वामी, महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, ब्रह्मानंद स्वामीजी सद्गुरू धाम कणुर, जी एन पी ग्रुपचे उद्योजक नारायणराव पवार उपस्थित राहणार असून शुक्रवार दिनांक 20 रोजी अभिषेक व होम हवन, काल्याचे किर्तन ह भ प अंकित महाराज महांगडे पसरणी, दुपारी महाप्रसाद, भुईंज बावधन कवठे कुडाळ येथील स्वामी समर्थ केंद्र मार्फत स्वामी समर्थ सारामृत वाचन, पुष्पवृष्टी आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन स्वामी समर्थ मठ कदमवाडी ओझर्डे, ग्रामपंचायत ओझर्डे, ग्रामस्थ मंडळ ओझर्डे, मठाधिपती संतोष महाराज कदम यांनी केले आहे.
स्वामी समर्थ मठावर दर गुरुवारी व नियमित पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन करण्यात
आलेले असून अन्नछत्रलयाचे बांधकाम पण मोठ्या दिमागत सुरू असून अन्नदानासाठी व अन्नछत्रलयाचे इमारतीसाठी स्वखुशीने कुणाला मदत करायची असेल तर स्वामी समर्थ मठ कदमवाडी मोबाईल नंबर 99 22 27 63 24 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्वामी समर्थ मठा वरील भक्त गणांनी केले आहे











