निकमवाडी ता.वाई हे होणार फुलांचे गाव


निरंजना न्यूज नेटवर्क – सचिन इथापे

जिल्हा परिषद सेस योजना सन २०२५/२६ अंतर्गत वाई तालुक्यातील निकम वाडी या गावाची फुलांचे गाव या संकल्पनेसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी निवड केली. सदर गावात योजना राबवण्यासाठी कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा कृषी अधिकारी कुंडलिक माळवे गटविकास अधिकारी वाई नारायण घोलप, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब जाधव यांचे मार्गदर्शन यांचे लाभले. निकमवाडी हे गाव खूप वर्षापासून फुल शेती या कृषी क्षेत्रामध्ये काम करत असून त्यांनी विविध जातीची शेवंती, गुलछडी, गुलाब ,पार्सलिची लागवड आधुनिक तंत्रज्ञानाने करीत आहेत.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पंचायत समिती वाईमार्फत सदरच्या योजनेतून शेतकऱ्यांना फुलशेती पूरक मल्चिंग पेपर वजन काटा, गुलछडीचे कंद, गुलाबाची कलमी रोपे, ग्लाडीओलस कंद इ. साठी अनुदान देणेत येणार आहे .

सदरचे योजनेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने फुल शेती लागवड या विषयावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी डॉ. मा. श्री .भूषण यादगिरवार फुल शेती तज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांना निमंत्रित केले होते.
त्यांनी फुलशेती मधून आधुनिक तंत्रज्ञाने लागवड केली तर कमी कालावधीत कमी क्षेत्रामध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो असे प्रतिपादन केले. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव मार्फत ग्लॅडिलस कंदाच्या नवीन प्रजाती जसे अर्क अमृत , अर्क सुहागन ,बीएफआर सोहन लागवड तंत्रज्ञान, जैविक बीज प्रक्रिया फुले बायोमिक्सने करणे इत्यादी बाबत माहिती दिली.शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानचा अवलंबन करणे गरजेचे आहे. निशिगंधा मध्ये अर्क प्रज्वल फुले रजनी या जातीना फुले बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांकडून मागणी असून उत्पादन अधिक देणाऱ्या जाती आहेत.
फुल शेतीमध्ये निमेटोड सूत्र कृमी , कंदकुज, यापासून पिकांचा संरक्षण करण्यासाठी जैविक बीज प्रक्रियेसाठी फुले बायोमिक्स, जीवामृत, गांडूळ खताचा वापर अत्यंत गरजेचा आहे.
सदरच्या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांचे शंकांचे समाधान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले. फुल शेतीमध्ये नवीन प्रजातींची आणि बाजारपेठेची माहिती मिळाल्यामुळे आदित्य उत्पादन काढण्याबाबत संकल्प व्यक्त करण्यात आला.
सदरच्या प्रशिक्षण सत्रासाठी ग्रामपंचायत अधिकारी सुधीर जाधव ग्रामपंचायत निकमवाडी यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले.


73
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!