निरंजना न्यूज नेटवर्क- निलेश बाबर
उडतरे (ता. वाई) येथील बाळासाहेब पवार हायस्कूलमधील ज्येष्ठ शिक्षक श्री. शंकर दगडे सर यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. उपसरपंच श्री. प्रकाश पवार व मित्र मंडळ, उडतरे यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना ६१२ वह्यांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमात श्री. दगडे सर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपसरपंच श्री. प्रकाश पवार, नरेंद्र बाबर, शिवाजी गायकवाड, कांतीनाथ बाबर, तानाजी जगताप, सुनिल पवार, शाळेचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर, श्री. शंकर दगडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.











