सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत सत्कार; २२२ जणांना लाभ आदेशांचे वितरण


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर 

उडतरे:

सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘आनंदी सेवानिवृत्ती’ कार्यक्रम गुरुवारी स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रिया शिंदे या होत्या.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, अजित साळुंखे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, लेखाधिकारी समाधान चव्हाण आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात एप्रिल, मे, जून आणि जुलै २०२६ या कालावधीत सातारा जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या एकूण २२२ कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती विषयक लाभांचे आदेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे १०, ग्रामपंचायत विभागाचे ११, आरोग्य विभागाचे १८, बांधकाम (उत्तर) विभागाचे ६, एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाचे ३, पशुसंवर्धन विभागाचे ७, अर्थ विभागाचा १, कृषी विभागाचे ३ तसेच शिक्षण (प्राथमिक) विभागातील १६३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

यावेळी मान्यवरांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवाकाळातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेच्या ‘आनंदी सेवानिवृत्ती’ उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवेचा सन्मान होत असून, त्यांच्या नव्या आयुष्याची सकारात्मक सुरुवात होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


116
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!