निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
उडतरे : शहिद जवान राजेंद्र कुंभार क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि सम्राट ग्रुप, उडतरे यांच्या वतीने कु. वेदांत विनायक कुंभार याची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शाल, पुष्पगुच्छ व रोपटे देऊन वेदांतचे अभिनंदन केले. त्याच्या या यशामुळे गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर वेदांतने हे यश संपादन केले असून भविष्यातही तो शिक्षण क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ व वेदांतचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सत्कार सोहळा पार पडला.











