निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
– कळंभे ता. वाई या गावच्या लोकप्रिय सरपंच सौ. नीलम विकास शिवथरे यांना नालंदा ऑर्गनायझेशन पुणे यांचा ग्राम समृद्धी राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदरील पुरस्कार सोहळा पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य आयोजित ग्राम समृद्धी पुरस्कार सोहळ्यात गावामध्ये मागील चार वर्षात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या फंडातून साडेसात कोटी रुपयांचे विविध विकास कामे मार्गी लावली गावातील ४२२ कुटुंबां पैकी २४० कुटुंबांना वैयक्तिक थेट लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. गोरगरीब कुटुंबातील महिलांना बचत गट स्थापन करून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले. हे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे कळंभे गावच्या सरपंच सौ. निलम शिवतरे यांना हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी राज्यातील निवडक सरपंच उपसरपंच तसेच कळंभे गावच्या आदर्श सरपंच ज्योती गायकवाड, सारिका गायकवाड, उपसरपंच शकुंतला चव्हाण माजी उपसरपंच आबाजी सुतार व सहकारी उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल ना. मकरंद आबा पाटील, खासदार. नितीन पाटील, छ.उदयनराजे भोसले, किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.











