निरंजना न्युज नेटवर्क- निलेश बाबर
– इतरत्र चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरीच्या घटना घडू नये यासाठी भुईज पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील ग्रामस्थांना चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस ठाण्याचे सपोनी पृथ्वीराज ताटे यांनी सतर्क राहण्याचा सूचना दिलेल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील सर्व ग्रामस्थांनी कामानिमित्त दिवसा अथवा रात्री बाहेरगावी जात असताना आपले घरातील मौल्यवान दागिने मोबाईल घरी ठेवून जाऊ नये. ते सोबत घेऊन जावे. घरातून बाहेर जात असताना घराची चावी घराच्या बाहेर चौकटीवर, खिडकी मध्ये अथवा इतर कोणत्याही वस्तूच्या खाली ठेवू नये. घराचे चावी सोबत घेऊन जावी. अथवा शेजारी र राहणाऱ्यांकडे ठेवावी. दिवसा व रात्री बाहेरगावी जात असताना शेजारी राहणाऱ्या लोकांना घरावर लक्ष ठेवण्याबाबत सांगावे. रात्री झोपताना दरवाजा सुरक्षित बंद केला आहे का याबाबत खात्री करून घ्यावी. रात्रीच्या वेळी गावात कोणी संशयित व्यक्ती फिरत असल्यास तात्काळ भुईंज पोलीस स्टेशन किंवा पोलीस पाटील यांना कळवावे. दिवसा गावात कोणी संशयित व्यक्ती काही कारण नसताना फिरत असल्यास त्याच्याकडे गावात का आला आहात. याबद्दल विचारणा करून भुईज पोलीस स्टेशनला कळवावे. गावात ग्राम सुरक्षा दल नसेल तर गावातील मुलांनी एकत्रित बॅटरी, काठी सोबत घेऊन गावात गस्त घालावी. चालण्यासाठी जात असताना अंगावर मौल्यवान दागिने घालू नये. सोने किंवा भांडी उजळून देतो असे म्हणणाऱ्या लोकांपासून सावधानी बाळगावी. महिलांनी घरी असताना कोणताही फेरीवाला सामान विक्री करण्यासाठी सेल्समन आल्यानंतर त्यांना घरात घेऊ नये. घरासमोरील मोटर सायकल, कार व्यवस्थित लॉक करावी व लॉक केल्याबद्दल खात्री करावी. असे आवाहन भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनी पृथ्वीराज ताटे यांनी भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील ग्रामस्थांना केले आहे.











