*पाचवड गणातील गावोगावी सौ. राणी कांतीलाल पवार यांच्या प्रचाराचा झंझावात* ,*पाचवड पंचायत समिती गणात सौ. राणी कांतीलाल पवार यांच्या उमेदवारीला नागरिकांचा प्रतिसाद*


 

पाचवड पंचायत समिती गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. राणी कांतीलाल पवार यांच्याकडून पाचवड गणात प्रचाराचा चोर चांगलाच वाढवण्यात आला आहे. गणातील प्रत्येक गावागावात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना गणातील गावांमध्ये प्रचाराचा झंजावात पाहायला मिळत आहे. सौ.राणी पवार या पाचवड गणामध्ये गावोगावी प्रचारा दौऱ्यानिमित्त गेल्या असताना स्थानिक ग्रामस्थांनी व महिलांनी त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. गावोगावच्या ग्रामस्थांनी सौ. राणी कांतीलाल पवार यांच्या उमेदवारीला आपला सकारात्मक पाठिंबा व्यक्त केला. लहान मोठ्यांसह सर्वांनीच त्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी पाचवड गणातील प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या अडी अडचणी आणि आवश्यक विकास कामावर भर देणार असून ग्रामस्थांच्या अपेक्षा समजून घेऊन त्या पूर्ण करण्याचा आणि लोकहित केंद्रस्थानी ठेवून सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार यावेळी सौ. राणी कांतीलाल पवार यांनी व्यक्त केला. श्री. कांतीलाल पवार व त्यांच्या पत्नी सौ राणी कांतीलाल पवार या पाचवड गणातील असे एकही गाव वाडी वस्ती उरलेली नाही जिथे त्या पोहचलेल्या नाहीत. प्रचार दरम्यान त्या स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिलांचे प्रश्न तसेच युवकांसाठी रोजगार या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्या ग्रामस्थांची संवाद साधत असून निवडून आल्यानंतर या प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवण्याचा विश्वास त्या मतदारांना देत आहेत. या प्रचार दौऱ्या दरम्यान बोलताना श्री.कांतीलाल पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते नामदार मकरंद पाटील यांच्या ध्येय धोरणांचा तसेच आजवर केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. ना. मकरंद आबांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी या पाचवड गणातील गावांमध्ये मिळाला असून पाचवड गणाचा सर्वांगीण विकास नामदार मकरंद पाटलांच्या मुळे झाला असून पाचवड गणाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून शेतकरी, महिला व युवकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कांतीलाल पवार यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्कमुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा त्यांच्या प्रचाराला अधिक बळ देत आहे. त्यामुळे पाचवड पंचायत समिती गणातील निवडणूक रिंगणातील प्रभावी उमेदवार म्हणून सौ. राणी कांतीलाल पवार पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यावेळी पाचवड गणातील ग्रामस्थांनी या निवडणुकीत सौ. राणी कांतीलाल पवार यांना मताच्या रूपाने आशीर्वाद देण्याचा विश्वास व्यक्त केला.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!