व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरममध्ये अनिल करंदकर यांचा गौरवशाली सन्मान”


निरंजना न्यूज- निलेश बाबर(संपादक)

पाचवड प्रतिनिधी – संजय भाडळकर

पंढरपूर | 16 नोव्हेंबर 2025
पंढरपूर येथे आज संपन्न झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया (V.O.M.) इंटरनॅशनल फोरम पत्रकार अधिवेशनात सातारा जिल्ह्याचे व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अनिल करंदकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते अनिल करंदकर यांना शाल, श्रीफळ व उत्कृष्ट पदाधिकारी ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे प्रभावी नेतृत्व, सामाजिक भान, तसेच संघटनात्मक कार्यातील योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी विविध जिल्ह्यांतील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनात पत्रकारितेतील बदलते स्वरूप, डिजिटल युगातील आव्हाने आणि जबाबदार मीडिया यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.

करंदकर यांनी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पत्रकार बांधवांच्या हक्कासाठी सातत्याने काम करण्याची ग्वाही दिली.


87
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!