निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या भुईंज ता. वाई बदेवाडी हद्दीत दगडे वस्ती या ठिकाणी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास शेडला आग लागण्याची घटना घडली. या आगीत शेडमध्ये साठवून ठेवलेल्या ट्रक भर जळणाने पेट घेत रौद्ररूप धारण केले. दरम्यान कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, दगडे वस्ती येते श्री. सोमेश्वर शंकर सुतार हे अल्पभूधारक शेतकरी कुटुंबा समवेत राहत आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी आंघोळीसाठी चूल पेटवली होती. दरम्यान चुल पेटवून ते दुसरीकडे गेले. चुली शेजारीच असलेल्या लाकडांनी पेट घ्यायला सुरुवात केली. तेव्हा शेडमध्ये साठवून ठेवलेल्या ट्रक भर जळणाने पेट घेतला. त्यावेळी शेड शेजारीच असलेल्या फॅक्टरीला सुद्धा आग लागली. या आगीमध्ये फॅक्टरीचे मालक सागर रामचंद्र सुतार यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच नजीकच असणारे शैलेश भोसले, अंकुश शिंदे, बाळू पवार, मदन शिंदे, राहुल शेवते, शशिकांत दगडे यांसह बदेवाडी ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना व वाई नगरपरिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. व आगीवर नियंत्रण मिळवले. सदर आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा भुईंज येथील ग्राम महसूल अधिकारी मोहन जाधव, महसूल सेवक महेश सुतार यांनी केला. यावेळी भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार तोडरमल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अग्निशामक दलाची आवश्यकता* सातारा – पुणे महामार्गावर वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. अशावेळी वाई नगरपालिका व किसनवीर कारखान्याचा अग्निशामक दल तात्काळ दाखल होतो. दरम्यान या अग्निशामक दलास कधीकधी विलंब लागतो. यासाठी महामार्गावर आनेवाडी टोल नाका ते जोशी विहीर यादरम्यान अग्निशामक दलाची आवश्यकता निर्माण झाली आहे.











