निरंजना न्युज नेटवर्क- निलेश बाबर
नागरिकांनचे व्यवहार अत्यंत जलद व सुलभ रीतीने व्हावेत यासाठी नागरिक ऑनलाईन प्रणालीचा वापर करतात मात्र, सध्याचे युग हे ऑनलाईन प्रणालीचे असून नागरिक ऑनलाईन प्रणालीला पसंती देतात.परिणामी हे ऑनलाईन व्यवहार करत असताना सायबर भामटे नागरिकांची फसवणूक करत असून नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी असे आवाहन भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनी पृथ्वीराज ताठे यांनी केले आहे. सद्यस्थितीत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले असून प्रत्येक व्यक्तीने कोणतेही ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना ॲप डाऊनलोड करताना त्याची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. कोणतेही नेट बँकिंग ट्रांजेक्शन करताना ओटीपी नंबर इतरांना शेअर करू नये. मॉल, हॉटेल, पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड स्वतःहून स्वॅप करावे. कोणत्याही अनोळखी इसमाच्या हातात देऊ नये, पिन कोड कोणालाही शेअर करू नये, आपल्या घरातील वयोवृद्ध आई-वडील मुले व इतर मंडळी ज्यांना मोबाईल वापरायची बिलकुल माहिती नाही त्या प्रत्येक व्यक्तींना समजावून सांगणे गरजेचे आहे. मोबाईलवर अनोळखी व्यक्ती व्हिडिओ कॉल करून संबंधित व्यक्तींची फसवणूक करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी आपल्या घरातील वयोवृद्ध आई-वडील व इतर मंडळींना मोबाईलवर अनोळखी इसमाचा व्हिडिओ कॉल आला तर कृपया तो कोणी उचलू नये तात्काळ तो डिलीट करावा. याबाबत घरातील शिक्षित व्यक्तींनी कुटुंबातील सदस्यांना सांगणे गरजेचे आहे. तसेच आपले व आपल्या घरातील इतर मंडळींचे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर व इतर सेवांमध्ये अकाउंट असल्यास अकाउंट प्रोफाइल लॉक करून ठेवावे. आपली पर्सनल डिटेल्स आपल्या मित्र-मैत्रिणी नातेवाईक यांनाच म्हणजेच ज्यांना ऍड करू त्यांना दिसेल अशा प्रकारे काळजी घ्यावी. तसेच अनोळखी व्यक्तींना शेअर होणार नाही याची काळजी घ्यावी. एक प्रकारे इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर इतर माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करत असताना समोरील व्यक्तीने जर आपल्याकडे पैशाची मागणी केली असल्यास त्या व्यक्तीला आपण जोपर्यंत समक्ष भेटत नाही त्या व्यक्तीची खात्री करून घेत नाही तोपर्यंत कोणतेही पैशाचे व्यवहार करू नये. आपण आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तीची सायबर गुन्हे द्वारे फसवणूक होऊ नये याबाबत काळजी घ्यावी व आपल्या घरातील मंडळींना त्यापासून सावध करावे. अशी आवाहन भुईज पोलीस स्टेशनचे सपोनी पृथ्वीराज ताटे यांनी केले आहे.











